हिंदी धडक वर मराठी सैराट भारी

 

सैराट सिनेमाचा हिंदी मध्ये रिमेक येणार याची जेव्हा पासून चर्चा सुरू झाली तेव्हा पासून या सिनेमात परशा आणि आर्ची कोण असणार याची उत्सुकता झाली. आणि त्यानंतर इशांत खट्टर आणि जान्हवी कपूरचे नाव समोर आले, तेव्हापासून या सिनेमाच्या ट्रेलरची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते.

सैराट हा संपूर्ण चित्रपट महाराष्ट्रच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे आणि धडक राजस्थानच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. सैराटच्या गोष्टीनेच लोकांना खूप खुश केले होते.  पण ज्या प्रकारचा धडक चा ट्रेलर आहे त्यावरून वाटतंय की हा चित्रपट सुद्धा लोकांची मने  जिंकेल.

सैराट VS धडक

सैराट चित्रपटामध्ये सर्व काही साध्या पद्धतीने दाखवण्यात आले होते. मग त्यामध्ये कलाकारांची भाषा असो की त्यांचे वागणे.
परंतु धडक मध्ये पाहीलं तर सर्वच काही भव्य दिव्य असे  दिसून येत आहे. यामध्ये चित्रपटातील ठिकाणे असतील किव्हा कलाकार. 

सिनेमातील चकाचकपणा आणि भाषा सोडली  तर काहीच वेगळपणा जाणवत नाही.

सैराट चित्रपटातील आत्मा म्हणजे त्यात असणारे झिंगाट गाणं आणि हे गाणं एवढं प्रसिद्ध झालं की आजही लोक या गाण्यावर नाचू लागतात.पण हा क्षण चित्रपटामधून कमी न होता त्याच रूपांतर हिंदी भाषेमध्ये करण्यात आलं आहे. कारण हाच या चित्रपटातील आत्मा आहे.

सैराट सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनात तेवढाच ताजा आहे . मग ते आरची परशा असो किव्हा मग सैराट मधील झिंगाट गाणं असो, आजही ती गाणी प्रेक्षकांना ताल धरायला भाग पडतात. धडक मध्ये अगदी शेवटी ऐकायला मिळणारं झिंगाट गाणंही आपल्याला मराठी सैराट सिनेमाकडे घेऊन जातं त्यामुळे सिनेमात काय आहे कसं असेल याची उत्सुकता कमी होते.

त्यामुळे मराठी सैराटच्या तुलनेत हिंदी सिनेमा असलेला धडक कमी पडतोय अस वाटतंय. तुम्ही धडक सिनेमाचा ट्रेलर पाहिलात का आणि तुम्हाला तो कसा वाटला ? सैराट पेक्षा तो तुम्हाला वरचढ वाटला का ? हे आम्हाला नक्की कंमेक्ट करा.

Now you can book your movie tickets with great offers, check here: BookMyShow, Freecharge, Paytm etc.

Have great food online to make your day complete with Behrouz Biryani, Swiggy, Faasos, KFC, Dominos, Zomato, OvenStory, Foodpanda etc.