एखाद्या घराच्या बाहेर किंवा सार्वजनिक ठिकाणी , काही हॉटेलमध्ये सुद्धा थोड्या विनोदी , तिरकस पाट्या दिसल्या की समजावं की आपण पुण्यात आलोय. आणि अशाच काही विनोदी पाट्यांचं प्रदर्शन पुण्यामध्ये भरवण्यात आलं आहे.
 
पुणे – पुणेकरांचे ज्ञान कैशल्य , टोमणे, उपदेश या सर्वांचा एकत्रित आस्वाद म्हणजे पुणेरी पाट्या.
घराच्या बाहेर , सार्वजनिक ठिकाणी किंवा हॉटेलमध्ये थोडी विनोदी , तिरकस पाटी दिसली की ओळखाव की तुम्ही पुण्यामध्ये आहात. अशा एक-दोन नाही तर तब्बल शे-दीडशे एकत्रित पाट्यांच प्रदर्शन पुण्यामध्ये भरवण्यात आल आहे. आणि या पाट्या पाहिल्यानंतर तुम्ही पोट धरून हसाल एवढ मात्र नक्की
पुणे तिथे काय उणे, असे नेहमी म्हंटले जाते. आणि याची प्रचिती तुम्हाला पुण्यामध्ये नक्की येईल. पुण्याचा दगडूशेठ हलवाई गणपती, शनिवारवाडा , चितळेंची भाकरवडी जशी प्रसिद्ध नसेल त्याहीपेशा जास्त प्रसिद्ध आहेत , पुणेरी पाट्या. पुण्यातल्या काही गोष्टी अगदी सातासमुद्रापार आहेत. त्यात पुणेरी पाट्या पहिल्या क्रमांकावर येतात.
या पाट्यांद्रारे पुणेकरांचा स्वभाव, त्यांची वागण्याची पद्धत, उपरोधिक टीका, कधी फटकळ, मात्र तेवढंच स्पष्ट, लोकांना योग्य संदेश जावा यासाठी या पाट्यांची निर्मिती झाली आहे. आणि अशाच काही पाट्या तुम्हाला एकत्रित पाहता येणार आहेत.