gurupornima

गुरूपौर्णिमा:- गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll  गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll

गुरूपौर्णिमेची थोडक्यात माहिती:-

गुरूपौर्णिमा ही भारतातील काही प्रसिद्ध सणांपैकी एक आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यात गुरूंचे महत्व खूप मोठे असते. आषाढ शुद्ध पौर्णिमा ही तिथी गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते आणि या दिवसाला व्यासपोर्णिमा सुद्धा म्हंटले जाते. ही गुरुपौर्णिमेची प्रथा महर्षी व्यासमुनींपासून चालू झाली आणि आजपर्यंत चालू आहे. आपल्या देशामध्ये रामायण महाभारतापासून गुरू शिष्य परंपरा चालू आहे. गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजे आपल्या आयुष्याचे जणू प्रतिबिंब आहे.

gurupornima

गुरुपौर्णिमा म्हणजे सद्गुरूंची पौर्णिमा समजली जाते आणि पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरू हा नेहमीच शिष्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे ज्ञान देत असतो. आणि गुरूने दिलेल्या ज्ञानाचा प्रकाश शिष्यपर्यंत पोहचावा म्हणून या दिवशी गुरुची प्रार्थना केली जाते. गुरू म्हणजे नेहमी आपल्यासाठी एक मार्गदर्शक तारा असतो.

gurupornima

आई ही आपली सर्वात पहिली गुरु असते. त्यानंतर आपल्याला ज्ञान देणारे शिक्षक. गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने याचे चिंतन करायला हवे की, “ हे ज्ञान प्राप्त होण्याआधी मी कुठे होतो? आता मी कुठे आहे? पूर्वी या ज्ञानाशिवाय तुम्ही कुठे होतात आणि आज कुठे आहात. तुम्ही ज्या ठिकाणी आहात ते फक्त तुमचा गुरू मुळे. गुरूपौर्णिमेच्या दिवशी ‘ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे’ अशी प्रार्थना करून, गुरूंना प्रथम वंदन करण्याची परंपरा आहे.

gurupornima

गुरू म्हणजे केवळ आपल्याला ज्ञान देणाऱ्या मानवरूपी गुरूची पूजा करावी असे नाही, तर ज्या घटकांपासून आपण ज्ञान मिळवितो तो प्रत्येक घटक आपला गुरू असतो. उदा. ग्रंथ, पुस्तके, वृक्ष एकूणातच सर्व निसर्ग या सर्वांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरु हा ज्ञानाचा सागर आसतो. जलाशयात पाणी कमी असेल तर आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. तसेच गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याशिवाय त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. अनेक विद्यालयांतून, महाविद्यालयांतून विद्यार्थी आपल्या गुरूंसमोर या दिवशी विनम्र भावनेने नतमस्तक होत असतात.

Gurupornima

गुरू म्हणजे ईश्वराचे सुंदर रूप. वर्षभर प्रत्येक गुरू आपल्या शिष्याला भरभरून ज्ञान देत असतात. आणि त्या गुरूंबद्दल अत्यंत आदराने व भावाने कृतज्ञता व्यक्त करणे हाच गुरुपौर्णिमा साजरी करण्यामागील हेतू आहे. अंधकाराचा नाश करून प्रकाशाचा मार्ग दाखवणारा गुरू असतो. जो सर्वाना चांगले शिक्षण व चांगले संस्कार देतो तो गुरू असतो.

गुरुविण कोण दाखवील वाट।

आयुष्याचा पथ हा दुर्गम,

अवघड डोंगर घाट।