मागील काही दशकामध्ये १२ लाख स्त्री भ्रूणहत्या झाल्या आहेत. स्त्री भ्रूण हत्येचा विषय चांगला गाजत असताना पैशाला चटावलेले डॉक्टर आपले कोणी वाकडे करत नाही, अशा आविर्भावात स्त्री भ्रूण हत्या करण्याचे पाप करत आहे. खरे तर अशा लोकांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. कायद्यातही सुधारणा करून कठोर कायद्याची तरतूद करण्याची गरज आहे.
स्त्री भ्रूणहत्या का होतात त्याची काही करणे:-
- मुलगा वंशाचा दिवा असतो.
- मुलगा उत्पन्नाचे साधन असतो.
- मुलीच्या शिक्षणावर केलेला खर्च वाया जातो. तिच्या शिक्षणाचा आपल्याला काही फायदा नसतो.
- मुलगा हा म्हातारपणाची काठी असतो.
- मुलगा हा मुलीपेक्षा सशक्त असतो. तर मुली कमजोर असतात
- एक मुलगी जन्मास आल्यानंतर पाठोपाठ अनेक मुली जन्माला येण्याची भीती.
सोनोग्राफी वरदान पण …….
सोनोग्राफी यंत्रामुळे बाळाची गर्भात कशी वाढ होत आहे ? गर्भातील मूळ कोणत्या आजाराने त्रस्त आहे का ? इत्यादी गोष्टी कळतात. पण काही वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी या वरदानच गैरवापर केला.
स्त्रीभ्रूण हत्येमुळे होणारे परिणाम
स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण जर असेच चालू राहिले तर अनेक कठोर समस्यांना सामोरे जावे लागेल. स्त्रीभ्रूण हत्येमुळे समाजात अविवाहित तरुणांची संख्या वाढत आहे . आणि महत्त्वाचे म्हणजे स्त्रीभ्रूण हत्येमुळे लैगिक अपराधांची संख्या वाढत आहे.
स्त्रीभ्रूण हत्येवरील काही उपाय
१) स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाचे मन परिवर्तन होणे खूप गरजेचे आहे .
२) वंशाचा दिवा फक्त मुलगाच होऊ शकतो या प्रवृत्तीचा नाश केला पाहिजे.आणि जो पर्यंत या प्रवृत्तीचा नाश होणार नाही तो पर्यंत स्त्रीभ्रूण हत्या कमी होणार नाही .
जनजागृती मोहीम
जनजागृतीची मोहीम लैंगिक दृष्टया सक्षम , विवाहेच्छुक आणि नवविवाहित अशा तरुण मुलामुलींमध्ये केंद्रित करणे गरजेचे आहे.
स्त्रियांसाठी काही चारोळी
तू तुझ्या डोळ्यात आणू नकोस पाणी;
तू तर आहेस रणरागिणी झांशीची राणी
जन्मु द्या त्या चिमुकलीला
सार्थक या जन्माचे होईल
पहाल तुम्ही, हिच चिमुरडी
एक दिवस आकाशी भरारी घेईल……..
का मारता तिला मातेच्या गर्भात
कारण ती एक मुलगी आहे ?
जरा भूतकाळ तपासुन पहा
स्त्री हीच जीवनाची शिल्पकार आहे.
Ashwin is the author of this article who works as a content writer at Couponmoto. The view and opinions expressed in this article are those of the author.