ssc-results

आता निकालाचे टेन्शन खल्लास…

नुकताच १२ वीचा निकाल जाहीर झाला आहे. अपेक्षित निकाल लागला नाही तर विद्यार्थांमध्ये नैराश्याचे वातावरण तयार होते. काही पालक निकालाबद्दल खूपच टोकाची भूमिका घेत असतात. पालकांच्या वर्तवणूकीला घाबरून मुलं अनेकदा चुकीचं पाऊल उचलतात. आत्महत्या, घरातून पळून जाणं या सारख्या बातम्या निकालाच्या कालावधीमध्ये आपल्या कानावर येतातच. विद्यार्थांनी अशी पाऊलं न उचलता स्वतः सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थांच्या मनामध्ये आशादायी दृष्टीकोन तयार होईल.

 

विद्यार्थांनी घ्यायची काळजी :

  • अपयश आले तर ते पचवण्याचे धैर्य ठेवा, भूतकाळामध्ये तुम्ही ज्या चुका केल्या आहेत त्यामधून बोध घ्या.
  • तुमचे ध्येय गाठण्यासाठी पूर्ण प्रयत्न करा तुम्हाला आलेले अपयश तुमच्यावर वढ-चढ होऊ देऊ नका.
  • स्वतःमधील सहनशीलता वाढवा.
  • परीक्षेमध्ये आलेले अपयश हे क्षणिक आहे. स्वतः मधील सकारात्मक दृष्टीकोन वाढवा.
  • तुमच्यामध्ये नकारात्मक्ता वाढली असेल तर पालक किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.खाण्यापिण्याच्या सवयीकडे दुर्लक्ष करू नका.

 

पालकांनी घ्यायची काळजी :

  • निकालाच्या कालावधीत मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.
  • परीक्षेमध्ये मिळणारे गूण हे मुलाचे आयुष्य ठरवू शकत नाही.
  • एखादे क्षेत्र निवडण्याआधी मुलाचा कल कोणत्या क्षेत्रामध्ये आहे याची माहिती करून घ्या.
  • मुलगा जर परीक्षेत नापास झाला असेल तरी त्याला धीर देऊन एक आशादायक दृष्टीकोन त्याच्या समोर उभा करणं अत्यंत महत्वाचे आहे.
  • आयुष्यामध्ये येणाऱ्या खाच- खळग्यांना हिंम्मतीने सामोरे जाण्याची प्रेरणा मुलांना देणे गरजेचे आहे.
  • निकालाच्या कालावधीत विद्यार्थांची मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न करते फार गरजेचे असते.
  • प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा आहे, जर तुमचा मुलगा एखाद्या विषयामध्ये हुशार नसेल तर दुसऱ्या विषयात तो नक्कीच पारंगत असू शकतो.