1) तुळस:-
तुळशीची आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजा केली जाते. परंतु त्याच बरोबर तुळस शरीराला सुद्धा खूप फायदेशीर आहे. थंडीमध्ये जर तुम्ही तुळशीच्या पानांचा चहा प्यायलात तर तुमचे थंडीपासून संरक्षण होते. तुळशीचे सेवन केल्याने आपला तणाव दूर होण्यास मदत होते. मधुमेह झालेल्या व्यक्तीसाठी तुळस सर्वात गुणकारी आहे. तुळस रक्तातील शुगरचे प्रमाण योग्य ठेवण्याचे काम करते.
2) पुदिना:-
पुदिन्याचे रोप कमी व जास्त ब्लडप्रेशर स्तिर ठेवण्याचे काम करते. पुदिन्याची चटणी आणि त्याचा जूस मधुमेह झालेल्या व्यक्तीला खूप उपयोगी आहे. म्हणून पुदिन्याचे एक तरी रोप आपल्या घरा शेजारी लावल्यास घरातील व्यक्तींना किव्हा आपल्या जवळच्या व्यक्तींना खूप फायदा होऊ शकतो.
3) कोथिंबीर:-
जेवणामध्ये चव वाढविण्यासोबत कोथिंबीर थकवा घालवण्याचे सुद्धा काम करते. कोथिंबिरीमध्ये व्हिटॅमिन A भरपूर प्रमाणामध्ये असते त्यामुळे मधुमेहाचा आजार नष्ट होण्यास खूप मदत होते. कोथिंबीरीचे सेवन केल्याने रक्तामध्ये असलेल्या इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रणात राहते. त्याचबरोबर कोथिंबीर शरीरामध्ये असणाऱ्या वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढविण्यास मदत करते.
4) कडीपत्ता:-
काडिपत्याचा उपयोग फक्त जेवणामध्ये चव आण्यासाठी केला जात नसून खूप साऱ्या आजारावर सुद्धा केला जातो. कडीपत्ता मधुमेह झालेल्या वक्तीसाठी एक रामबाण औषध आहे . मधुमेह झालेल्या वक्तींनी दररोज ५-६ काडीपेटीची पाने खाल्यास त्याचा मधुमेह रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो.
5 लसूण:-
लसणाचे गुण आपणा सर्वाना माहीतच आहेत. लसूण एक एंटीबायोटिक असण्याबरोबरच एक ब्लड प्युरिफायर म्हणून सुद्धा काम करते. जे आपले रक्त शुद्ध करण्याबरोबरच आपले हात आणि पायांच्या सांधे दुखी सुद्धा कमी करण्यात मदत करते. त्याचबरोबर सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे लसणाच्या उपयोगामुळे कॅन्सर सारख्या मोठ्या आजारावर सुद्धा मत करता येते.
जसे कि आम्ही आपणास सांगितलेल्या या सर्व झाडांमुळे आपल्या घराच्या शेजारील सुंदरते बरोबरच आपले शरीर सुद्धा निरोगी ठेवा. चला मग वाट नका पाहू, आजचा आपल्या घरी या झाडांची लागवड करा.