turmeric-powder

हळदीचे प्रकार

१) लोखंडी हळद – लोखंडी हळदीचा वापर फक्त रंग बनवण्यासाठी होतो.

२) सुगंधी हळद – सुगंधी हळदीचा वापर मसाल्यात केला जातो.

३) आंबे हळद – आंबे हळदीमध्ये औषधी गुणधर्म असतात.

हळदीच्या गाठी जमिनीतून काढून स्वच्छ करून त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर त्या सुकवल्या जातात. सुकवलेली हळद नंतर विकली जाते.

हळदीमुळे खाण्यात स्वाद तर वाढतोच पण या हळदीचा वापर शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठीही होतो. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठीच हळद फायदेशीर आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे एक विलक्षण सामर्थ्य या हळदीत आहे. दुधातून हळद घेण्याचे फायदे तर सर्वांनाच माहित आहेत. पण हळद गरम पाण्यातून सेवन केल्यास त्याचे अनेक फायदे आहेत.

हळदीचे फायदे

१) हळदीत ‘करक्युमिन’ नावाचे रसायन असते. शरीरातील सूज कमी करण्यासाठी ‘करक्युमिन’ हे रसायन फायदेशीर आहे.

२) हळदीत ‘करक्युमिन’ असल्याने गुडघेदुखी कमी होते.

३) बुद्धी तल्लख राहते.

४)  डोकेदुखीच्या आजारात हळदीचे पाणी फायदेशीर

५) हळदीचे सेवन केल्याने ‘ग्लुकोज’ची लेव्हल नियंत्रणात राहते.

६) गरम पाण्यात लिंबू, हळद आणि मध टाकून प्यायला पाहिजे. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात.

७) हळदीतील ‘अँटीऑक्साइड’ कॅन्सरच्या कोशिकांना नष्ट करते.

८) हळदीच्या पाण्याने रक्त साफ होते.

९) रोज नियमित हळदीच्या पाण्याचे सेवन केल्यास मासिक पाळीच्या समस्या दूर होतात.

१൦) वजन कमी होण्यास हळदीचे पाणी फायदेशीर ठरते.

११) हळदीच्या पाण्यामुळे जळजळ होणे थांबते, पचनक्रिया सुधारते.

हळदीचे पाणी रोज सेवन केल्याचे फायदे

स्वयपाकघरांचा आणि गृहिणींची जीव की प्राण असणारी हळद शरीरासाठी उपयुक्त आहे. भारतामध्ये हळदीची लागवड पूर्वीपासून केली जाते. हळदीचे रोप सुगंधी असते. हळदीच्या कंदाला जमिनीत गाठी फुटतात. या गाठी पिवळ्या आणि चमकदार रंगाच्या असतात. या गाठी म्हणजे ‘हळद’.